२०२४ साठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार; “या’ तगड्या नेत्यांवर मतदारसंघांची जबाबदारी

मुंबई/प्रतिनिधी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता संघटनेमध्ये काही बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत अनेक राज्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाऊ शकतात. तसेच, स्थानिक पातळ्यांवरही बदल केले जातील. असे वर्तवले जात असतामा पक्षातून मोठी अपडेट समोर आली आहे. मतदार संघांचे निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या. विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना पुणे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे. भाजपने मिशन २०२४ मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघांची जागा रिक्त झाली आहे. या मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याचीशक्यता वर्तवण्यात येत आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजप कोणाला उमेदवारी जाहीर करणार याची चर्चा रंगली असतानाच पुणे जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघाची जबाबदारी वाटण्यात आली आहे. पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडेजबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. शिरूरलोकसभा मतदारसंघाची जबाबदारीमहेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी शनिवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत खासदार आणि आमदारांचा देखीलसमावेश होता. या बैठकीमध्ये निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचानिर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.