वर्ध्यात रा. स्व. संघाचा साहित्य विक्री स्टॉल

वर्धा/प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांतच्या साहित्य विक्री दिवसानिमित्तजिल्हा स्थानिक सोशालिस्ट चौकात रविवार १२ रोजी साहित्य विक्री स्टॉल लावण्यात आला होता. साहित्य विक्री केंद्राचे उद्घाटन प्रसिद्ध सनदी लेखापाल राजेंद्र भुतडा, सामाजिक कार्यकर्ता किरण सरोदय यांनी केले. संघ साहित्य हे व्यावसायिक साहित्य नसून राष्ट्रीय साहित्य आहे. चरित्र निर्माणातून राष्ट्र निर्माण प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे साधन आहे, असे मत किरण सरोदय यांनी व्यक्त केले. राजेंद्र भुतडा यांनी संघ साहित्य खरेदी करुन विक्री केंद्राला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्धा नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, जिल्हा कार्यवाह मुकुंद पिंपळगावकर, प्रचारक दीनदयाल कावरे, भारतीय विचार मंचचे प्रमुख प्राचार्य डॉ. धर्मेंद्र मुंधडा, डॉ. अश्विनी कुमार, मदन परसोडकर, निलेश बावनकुळे, हिरेन जानी, अनिल खीचरे, विनोद भारद्वाज, अतुल शेंडे आदी स्वयंसेवक कार्यकर्ते उपस्थित होते.