अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पाच हजार प्रति क्विंटल अनुदान देण्याची किसानसभेची मागणी

वर्धा/प्रतिनिधी यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी व गारपीट झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापुस, सोयाबीन २-३ क्विंटलच्या वर झालेच नाही. त्यामधे जो कापुस मागील वर्षी १० हजार प्रति क्विंटल होता. तो ७ ते ७५००/- रुपये प्रति क्विंटलवर आला. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला या दरातील कापुस घेऊन गुजरातकडे नेऊन १२ ते १३ हजार प्रति क्विंटलने विकण्याचा सपाटा लावुन कास्तकारांना अडचणीच्या वेळेस मारक ठरला आहे. अशा अडचणीच्या कैचीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट ५०००/- रुपये प्रति क्विंटल अनुदान देऊन शेतकऱ्यांचा रोष पदरात पाडुन न घेता तात्काळ मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी किसानसभेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव कोकाटे यांनी राज्यसरकारकडे निवेदनातून केली. निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले. ते पुढे म्हणाले ५०,०००/- रुपये महात्मा ज्योतीबा फुले सहाय्यता योजनेतून नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर केले होते. ते जटिल अटी टाकुन कास्तकऱ्यांच्या तोंडाला पाणेच पुसले.                                    ३ वर्षापूर्वी म्हणजे २०२१ च्या कर्जदात्याला ते ५० हजाराचे अनुदान मिळत नाही ती अट शिथिल करुन तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करुन येणाऱ्या नविन हंगामाच्या कामात यावी त्यासाठी ती अट शिथिल करावी अशी मागणी किसानसभेच्या जिल्हाध्यक्षांनी निवेदनाद्वारे केली. लवकरच या संदर्भात आंदोलनाचा इशारा शासनाला दिला. निवेदन देतेप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, रा.काँ. जिल्हा सरचिटणीस निळकंठ पिसे व विनय डहाके, निळकंठ राऊत, विशाल हजारे, प्रविण पेठे, बंटी खडसे, प्रविण कडु, प्रथमेस हांडे, सुदर्शन गोल्हर, काँग्रेस पक्षाचे माजी शहर अध्यक्ष सुधिर पांगुळ इत्यादींची निवेदन देतांना उपस्थिती होती.