डिसेंबर २०२३ पर्यंत देवळी रेल्वे च्या नकाशावर येणार..!; खासदार रामदासजी तडस यांची माहिती

देवळी/प्रतिनिधी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प दोन टप्प्यात आहे. पहिला वर्धा ते यवतमाळ ७८ किलोमीटर, तर दुसरा टप्पा यवतमाळ ते नांदेड २०६ किलोमीटर असा एकुण रेल्वे मार्ग २८४ किमी अंतराचा अस ून, साड ेतीन हजार का ेटी खर्चातून पूर्णत्वास जात आहे. वर्धा जिल्हयातील पहिल्या टप्पातील वर्धा ते कळंव ४० किलोमीटर व कळंब ते यवतमाळ ३८ किलोमीटर, वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे मार्गाचे वर्धा ते यवतमाळ या पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. यवतमाळ ते नांदेड रेल्वेमार्गाच्या सिंगल लाइनचे काम प्रगतिपथावर असून, या मार्गावर १५ मोठे ब्रीज, २९ बोगदे तसेच ५ उड्डाणपुलांचे बांधकाम करण्यात येत आहे.या मार्गावर वर्धा ते कळंबपर्यंत ४० किमी अंतराच्या रेल्वेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. सोबतच देवळी रेल्वे स्टेशनच्या सुसज्ज्ा वास्तूंचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्लॅटफॉर्मचे बांधकाम तसेच इतर कामे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळेच येत्या जानेवारीपर्यंत वर्धा-देवळी ते कळंब मार्गावर रेल्वे धावणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या रेल्वे मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली. देवळी परिसरात रेल्वे कामाची पाहणी करीत असताना वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी नागपूर विभागीय रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, रेल्वेचे अप्परमंडल प्रबंधक, रेल्वेचे उपमुख्यअभियंता प्रशांत नेलिकवार यांची प्रमुख उपस्थिती होती. देवळी येथे रेल्वे स्थानकाची ईमारत पुर्ण झाली असुन प्लॅटफार्मव ट्रक चे कार्य देखील अंतिम टप्प्यात आहे, पुढील टप्प्यातईमारतीचे बांधकाम व भव्य प्रवेश व्दार स्वतंत्र सग्राम सेनानी यांच्या आठवणी साकारण्याचा प्रयत्न रेल्वेविभागामार्फत प्रस्तावीत करण्यात येणार आहे. २००९ मध्ये मंजुर झालेलावर्धा -यवतमाळ- नांदेड रेल्वेप्रकल्पाची प्रत्यक्ष सुरवात वर्ष२०१६ नंतर जलदगतीने झाली, केन्द्र व राज्य सरकारने मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुनदिला.

महत्वाची बाब म्हणजे हा प्रकल्प पंतप्रधान कार्यालयातीलप्रगती पोर्टल या यंत्रणेतून देखरेख केला जात असुन कालबध्द वेळेतकार्य पुर्ण करण्याचा केन्द्रशासनाचासंकल्प आहे. नोव्हेंबर/डिसेंबर२०२३ मध्ये रेल्वे विभागाच्यामार्फत वर्धा ते कळंब दरम्यानचाचणी सुरु करण्यासाठी प्रशासनानेसमन्वय राखुन कार्य करावे अश्या सुचना यावेळी खासदार रामदास तडस यांनी उपस्थित अधिकारीवर्गाला दिल्या. वर्धा व यवतमाळ जिल्हा या प्रकल्पामुळे रेल्वे जोडला जाणार असुन देवळी रेल्वे स्थानक येथे देवळी परीसरातील औद्योगिकमहत्व लक्षात घेता मालधक्काप्राधान्याने वेळेत पुर्ण करावाव त्याकरिता आवश्यक तरतुदीनियोजनात करुन घ्याव्या याबद्दल खासदार रामदास तडस यांनी निर्दे श दिले.

वर्धा येथून नांदेड ला जाणारा एक पर्यायी रेल मार्ग उपलब्ध होणारअसुन पुर्वी नांदेडला जाण्याकरिता रेल्वे मार्गान १०.३० तासाचाअवधी लागत आहे, हा प्रकल्प पुर्ण झाल्यावर प्रवासाचा कालावधीफक्त ४ ते ४.३० तास इतका होणारहे, विदर्भ व मराठवाडयालजोडणारा या प्रकल्पामुळे थेटप्रवासी मार्गाचा एक चांगलापर्याय उपलब्ध होणार असुन कमीकिंमतीत नागरिकांना प्रवास करणे शक्य होईल. या महत्वपुर्ण विषयाचाप्रत्यक्ष आढावा घेण्याकरिता मी स्वतः रेल्वे अधिकारी वर्गाच्याउपस्थितीत पाहणी केली वरितसर आढावा घेतला, हा प्रकल्पलवकरच लोकसेवेत दाखल होईलअसा विश्वास यावेळी खासदाररामदास तडस यांनी व्यक्त केला.