स्वत:च्या दुखण्यापेक्षा “त्यांच्या’ चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा- आ. कुणावार

हिंगणघाट/प्रतिनिधी तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना तातडीने पंचनामे करून मदत मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत करणार्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्यांचा सिंहाचा वाटा असून हिंगणघाट उप विभागातील समस्याग्रस्त नागरीक तसेच शेतकर्यांना २४ तासात लाभ मिळवून देणारी राज्याचे महसूल उपविभागातील एकमेव घटना असल्याचा उल्लेख करीत आ. समीर कुणावार यांनी यावेळी हिंगणघाट उप विभागातील अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले. विधानसभा मतदार संघातील १४०२ लोकांना प्रत्यक्ष पट्टवाटपाचे प्रमाणपत्र देतानाउभे राहील्याने पाय दुखतात.मात्र, प्रमाणपत्र घेताना त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहुन आपणदुखणे विसरून जाते, असे आ. कुणावार म्हणाले. शासन आपल्यादारी या उपक्रमांतर्गत नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप तसेचसर्वांसाठी घरे योजनेंतर्गत भूखंडांचेपट्टे वाटप आयोजित कार्यक्रमातआज ८ रोजी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, त्यांनी सर्व समस्याग्रस्त नागरिकांचीकामे प्रशासनातील अधिकार्यांनी वेळेवरती करून शासन लोकाभिमुख असल्याचं सिद्ध करण्याचे आवाहन केले. आज ८ रोजी स्थानिक कलोडे सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात सुमारे १४०२ पीडितांना नैसर्गिक आपत्ती खावटीच्या दुसर्या टप्प्याचे वाढीव अनुदान वितरीत करण्यात आले तसेच तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील ३० गावकर्यांना भूखंडांचे पट्टे वितरीत करण्यात आले याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार सतीश मासाळ, मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, भाजपा जिल्हा महामंत्री किशोर दिघे, भाजयुमो प्रदेश सचिव अंकुश ठाकुर, भाजपा शहराध्यक्ष आशिष पर्बत, तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, नायब तहसीलदार समशेर पठाण, अन्न पुरवठा अधिकारी सुहास टोंग,सबंधित अधिकारी व कर्मचारी, तलाठी तसेच लाभार्थी उपस्थित होते.