वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची सुप्रीम कोर्टाकडून दखल, सरन्यायाधीशांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली/प्रतिनिधी देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांच्या चिंतादेखील वाढल्याआहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी वकिलांना मोठी सूट दिली आहे.सरन्यायाधीशांनी वकिलांना न्यायालयात वच्यर्ुअली हजर राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता वकीलही वर्क फ्रॉम होम (घरून काम) करू शकतील.सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, वर्तमानपत्रांमधील रिपोर्ट्स सांगतायत की, देशात कोरोना रुग्णांची संख्यावाढत आहे. अशा परिस्थितीत जर वकील न्यायालयात वच्यर्ुअली हजर राहणार असतील तर ते असं करू शकतात. तसेच वकील हायब्रिड पद्धतीने देखीलकाम करू शकतात. भारतात गेल्या २४ तासात तब्बल ४,४३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या १६३ दिवसांमधील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. गेल्या २४ तासांत आढळलेल्या नवीन रुग्णांसह देशातील एकूण सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २३ हजारांच्या पुढे गेली आहे. दुसऱ्या बाजूला मृतांची संख्यादेखील वाढली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनामुळे १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यूंची नोंद महाराष्ट्र आणि केरळमध्ये झाली आहे. दोन्ही राज्यात प्रत्येकी चार मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे ५,३०,९१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.