महाकाळी येथे “एनडीआरफ’कडून सरावाचे प्रात्यक्षिक

वर्धा/प्रतिनिधी आर्वी तालुक्यातील महाकाळी धरणातील पाण्यामुळे काही गावांना पुराचा जबर फटका बसतो. पुरामुळे हा ेणारी संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व ५ बीएन पुणे युनिटच्या (महाराष्ट्र) जवानांनी महाकाळी आणि यशवंत विद्यालय येथे बचावकार्याचा सराव केला. काही तरुणांना बचावकार्याचे प्रात्यक्षिकाञ्च्ाारे प्रशिक्षण दिले. एनडीआरएफचे दहा जवान, टीम लिडर बिपिन बिहारी यांच्या मार्गदर्शनात रहांगडाले यांनी प्रशिक्षण दिले. एनडीआरएफच्या जवानांनी नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचा व इतरांचा साहित्य घरातील टाकाऊ वस्तूपासून कसे तयार करायचे, याचे प्रशिक्षण दिले.

खोल पाण्यात बुडताना त्यांना कसे वाचवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी तहसीलदार रमेश कोळपे, नायबत तहसीलदार अजय धमार् धिकारी, बाळ ूताइर् भागतव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभाम घोरपडे यांची उपस्थिती होती.

या आहेत आपत्ती

पाण्यात बुडणार्या व्यक्तींर्ना वाचविणे, पाण्याबाहेर काढल्यानंतर त्यावर करावयाचे उपाय, अंगावर वीज पडू नये, यासाठी घ्यावयाची काळजी, भूकंपापासून बचाव करणे, विहिरीत पडलेल्या व्यक्तीला वाचविणे, पुरात झाडावर अडकलेल्याला झाडावरून बाहेर काढणे, अपघात, त्यातील जखमेवर करावयाचे प्राथमिक उपचार आदींची माहिती देण्यात आली.

एनडीआरएफ म्हणजे काय?

एनएफआरडीचे पूर्ण नाव हे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल असे आहे. एनडीआरएफ नैसर्गिक आपत्ती असताना काम करते. भूकंप, पूर यासारख्या परिस्थितीत, एनडीआरएफ फोर्सची एक टीम तयार केली जाते. संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी त्या टीमला पाठवले जाते. यामध्ये तीन बीएसएफ, दोन सीआरपीएफ, दोन सीआयएसएफ, दोन आयटीबीपी आणि दोन एसएसबी जवानांचा समावेश असतो.