मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व रक्तदान

Eknath Shinde Age, Caste, Wife, Children, Family, Biography & More »  StarsUnfolded

शिबिराचे आयोजन आष्टी (श)/प्रतिनिधी म ुख्यम ंत्री एकनाथ शिंद े या ंच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे ९ रोजी आरोग्य उपचार शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर यांनी आरोग्य शिबिराचे तर बाळासाहेबांची शिवसेनापक्षाचे तालुकाप्रमुख रुपेश बोबडे यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. या शिबिराला अशोक विजयकर, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक प्रीती पराडकर, वैद्यकीय अधिकारी अर्शिया शेख, शिवसेनेचे सुरज पिटेकर,अश्फाक शेख, शुभांगी अजमिरे, गुलशन अग्रवाल, भाजपा युवा मोर्चाचे प्रज्वल चोहटकर, स्वराज शिरभाते, भावेश म्हात्रे, सौरभ कदम आदींची उपस्थिती होती. कमलाकर निंभोरकर, रुपेश बोबडे, अशोक विजयकर, सुरज पिटेकर यांनी मार्गदर्शन करून शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक डॉक्टर प्रीती पराडकर संचालन प्रकाश इंगळे यांनी तर आभार डॉक्टर राऊत यांनी मानले.