
नवी दिल्ली/प्रतिनिधी केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पापूर्वी देशातीलशेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोदी कॅबिनेटने आज(२९ जानेवारी) दोन महत्त्वपूर्ण निर्णयांनामंजुरी दिली. या निर्णयाचा कृषी क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रांनाहीफायदा होणार आहे. याशिवायमंत्रिमंडळाने १६३०० कोटीरुपयांच्या नॅशनल क्रिटिकलमिनरल्स मिशनलाही मान्यता दिलीआहे. याद्वारे देशाला खनिजांच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यानेतृत्वाखाली उउएअ (कॅबिनेटकमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स)ने इथेनॉल खरेदीसाठी सुधारितकिमतींना मंजुरी दिली आहे. या किमती १ नोव्हेंबर २०२४ ते३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू राहतील.