
मुंबई/प्रतिनिधी मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा नव्यानं सुरू होणार असल्याची माहितीपुढे आली आहे. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा आरक्षण कायद्याला आव्हानदेणाऱ्या याचिकांवर सुरूवातीपासून पुन्हा सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीनंनवनियुक्त मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली होती. तसेच नवीन विशेष पूर्णपीठ स्थापन करण्याचेही हायकोर्टाला साकडे घातलेहोते. दरम्यान या विनंतीला न्यायमूर्तींकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली पूर्णपीठ नव्यानंसुनावणी घेण्यास तयार झाले आहे. सोबतचयाचिकाकत्याना याबाबत रजिस्ट्रारकडे नव्यानअर्ज करण्याचे ही कोर्टानं निर्देश दिले आहेत.