खड्ड्यामुळे कापसाची ट्राली पलटी; चालक जखमी

दरम्यान, सोमवारी दुपारी १२ वाजता डोंगरगाव येथून कापूस भरून ट्रॅक्टर समुद्रपूरकडे येत असताना रेणकापूर गावासमोरील खड्डा न दिसल्याने ट्राली पलटी झाली. या अपघातात चालक जखमी झाला. ट्रॅक्टर पलटी झाल्याने काही वेळासाठी वाहतूकही विस्कळीत झाली होती. या मार्गांवरून दररोज कोळशाची जड वाहतूक होत असल्याने रस्त्याची पूर्णत: चाळण झाली आहे. सुदैवान अपघातात जिवीहानी टळली. या अपघाताची माहिती देत गावकर्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार देऊन येत्या दोन-तीन दिवसात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.