छोट्या व्यवसायातील सर्व गांधीजन- डॉ. विभा गुप्ता

वर्धा/प्रतिनिधी निसर्ग जे बोलत नाही ते आम्ही समजने हाच शांतीमय आणि अहिंसक समाज निर्मितीचा आधार आहे. देशातील जे कारागिर, शेतकरी आणि छोट्या व्यवसायात आहे ते सर्व गांधीजन आहेत. त्यांच्याकरिता आधुनिक औजार किंवा साधने बनविण्याची आणि बीज स्वराज्य, तेल स्वराज्य वस्त्र, स्वराज्य माती स्वराज्य आणण्याची गरज आहे, डॉ. विभा गुप्ता म्हणाल्या. ४८ व्या सर्वोदय समाज संमेलनाच्या अहिंसक समाज निर्मितिचे पैलू या विषयावरील परिचर्चेत डॉ. विभा गुप्ता बोलत होत्या. यावेळी मोहन हिराबाई हिरालाल, सवाई सिंह, संजय सिंह, अन्नामलाई, सदाशिव पिल्लई, रवींद्र भाई आदी उपस्थित होते. डॉ. गुप्ता पुढे म्हणाल्या की, देशात गांधी जनाची संख्या मोठ्या प्रमाणत आहे त्यांना समजून घेणे आवश्याक आहे.
आम्ही अधुरे नाही तर पूर्ण आहोत याचे भान ठेवून काम करण्याची गरज आहे. लहानपणापासूनचा अहिंसेचे प्रयत्न केले जावे तरच अहिंसक समाज निर्मिती शक्य असल्याचे त्या म्हणाल्या. मोहन हिरालाल म्हणाले की, अहिंसक समाज निर्मितीचे स्वप्न गांधी-विनोबांनी बघितले होते. त्यादृष्टीने सर्वोदय समाजाची निर्मिती महत्त्वाची होती. हिंद स्वराज्य या गांधीजींच्या पुस्तकात याबाबत योग्य दिशा दिली आहे. “काय नको’ याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले तर “स्वराज्य शास्त्र’ या विनोबाच्या पुस्तकाने सर्व संमतीने निर्णय घेण्याबाबत तर गांधी मैने जैसे देखा समझा या पुस्तकाने कसा अहिंसक समाज निर्माण होऊ शकते याबबत योग्य दिशा दर्शन केले आहे. याच आधारावर लेखा-मेंढाचे काम झाले. वर्तमानात सुद्धा अहिंसक समाजाचे स्वरूप वास्तविक उतरविता येते. त्यांनी नारा दिला “हमारा मंत्र-जय जगत, हमारा मंत्र-ग्रामदान से ग्रामस्वराज्य आणि हमारा लक्ष- विश्व शांती,’ असल्याचे त्यांनी सांगितले. संजय सिंह यांनी, मनुष्य निर्माणाशिवाय अहिंसक समाज निर्माण होऊ शकत नाही तेव्हा सर्वोदय समाजाचा लक्ष्य मनुष्य निर्माणचे असले पाहिजे. असे आवाहन केले. संचालन डॉ. विश्वजित भाईने केले तर आभार भूपेश यांनी केले.