जिल्ह्यांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

वर्धा/प्रतिनिधी जिल्ह्यातील पोलिस निरीक्षक,सहाय्यक पोलिस निरीक्षक वपोलिस उपनिरीक्षक यांच्याप्रशासकीय बदल्या करण्यात आल्याअसून ९ अधिकार्यांना नवीन नेमणुकीसाठी पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.तर २७ अधिकार्यांना नवीनेमणुकीच्या ठिकाणी हजरहोण्याकरिता तत्काळ कार्यमुक्तहोऊन अनुपालन अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.शहर पोलिस ठाण्याचे पोलिसनिरीक्षक सत्यवीर बंडीवार यांची विनंती अमान्य करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत स्थगितीदेण्यात आली आहे. पोलिस आयुक्त नागपूर शहर येथील पोलिस निरीक्षक महेशचव्हाण हे पुढील आदेशापर्यंतरामनगरचे ठाणेदार म्हणून कार्यभारसांभाळतील. दहेगावचे ठाणेदार योगेश कामाले, तळेगावचे आशिष गजभीये, वर्धा नियंत्रण कक्षातील सहा. पोलिस निरीक्षक यशवंत किचक, सावंगी मेघे ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक महेश इटकल, सेलूचे पोलिस उपनिरीक्षक सुरेश कोहळे, आर्वीचे पोलिस उपनिरीक्षक देवानंद केकन, तळेगावचे हुसेन कादर शहा, समुद्रपूरच्या महिला पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम यांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. कारंजाचे ठाणेदार दारासिंग राजपूत यांची वर्धा नियंत्रण कक्षात, कैलास पुंडकर यांची हिंगणघाटचे ठाणेदार म्हणून रामनगरचे संजय मिश्रा यांना वडनेरचे ठाणेदार म्हणून नियुक्ती देण्यात आली. समुद्रपूरच्या सहा. पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे यांना कारंजा तर पोलिस उपनिरीक्षक हर्षल नगरकर यांची आर्वी आणि हिंगणघाट संलग्न नियंत्रण कक्ष वर्धा येथील पोलिस उपनिरीक्षक बाबू मुंडे यांची दहशतवाद, नक्षलवाद विरोधी शाखा वर्धा येथे नियुक्ती देण्यात आली आहे. वडनेरचे ठाणेदार कांचन पांडे यांची वर्धा आर्थिक गुन्हे शाखेत, रामनगरचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांची कारंजाचे ठाणेदार म्हणून तर सिंदीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांची सेवाग्राम पोलिस ठाण्यात ठाणेदार म्हणून त्यांच्या विनंती अर्जावरून नियुक्ती देण्यात आली आहे.