जिल्ह्यातील विकास कामे तातडीने पुर्ण करा- पालक सचिव अनुपकुमार यादव
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महिला व बाल विकास विभाग तथा जिल्ह्याचे पालक सचिव अनुपकुमार यादव यांनी आज जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यात सेवाग्राम विकास आराखड्यासह विविध विभागांची सुरु असलेली विकास कामे लवकरात लवकर पण करा, अशा सचना त्यानी कल्या. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद राजूरवार, तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीस जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्हा वार्षिक योजना व जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा सादर केला. जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचा आढावा घेतांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर कामे तातडीने सुरु करावी. विभागांना प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च होण्यासोबतच मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत अनेक कामे सुरु आहे. सुरु असलेली आणि सुरुच न झालेल्या कामांना गती देण्यात यावी.
आराखड्यातील कामातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जिवन दर्शन घडणार असल्याने कामे लवकर होण्यासोबतच गुणवत्तापूणकरण्याच्या सूचना पालक सचिवांनीकेल्या. यावेळी त्यांनी पायाभूत सुविधेची मोठव त्यासंबंधीची कामे, जिल्हा विकासआराखडा, ग्रीस्टॅक प्रकल्प, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप, मुख्यमंत्री कृषी सौरवाहिनी योजना, भारत व महानेट प्रकल्प, महासंपत्ती प्रणाली, आकांक्षित तालुकाउपक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमव क्लस्टर डेव्हलपमेंट, बालविकास प्रकल्पकार्यक्रम, जिल्ह्यात नव्याने मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शक्तीपीठ महामार्ग,नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, जिल्ह्यातीलसिंचन प्रकल्प, घरकल, ग्रामीण जीवनोन्नतअभियान, मुख्यमत्री समद्ध पचायतराजअभियान, स्वच्छता भारत मिशन, जलयुक्तशिवार, जनजीवन मिशन आदी विविध विषयांचा आढावा घेतला.









