महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन देवळी येथील इनडोअर स्टेडियम करावे
वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल (आयपीएस) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांची सदिच्छा भेट
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम,वर्धा : वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक मा.श्री.सौरभ अग्रवाल (आयपीएस) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन श्री. रामदासजी तडस इनडोअर स्टेडियम, देवळी घ्यावी या विषयांवर चर्चा केली, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना व वर्धा जिल्ह्याशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये दरवर्षी हजारो पोलीस अधिकारी व कर्मचारी विविध खेळामध्ये सहभाग घेतात. स्पर्धेमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, जलतरण, बॉक्सिंग, कुस्ती, टेनिस, ज्युदो आणि इतर अनेक क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होतात. देवळी येथे शासनाने उभारलेल्या क्रीडा सुविधांचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे. देवळी येथील माजी खासदार श्री. रामदासजी तडस इनडोअर स्टेडियममध्ये कबड्डी, खो-खो, बॉक्सिंग, कुस्ती, टेनिस करिता लागणाऱ्या या सर्व आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध असून महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन देवळी येथे केल्यास याचा फायदा पोलीस विभागाला होईल असे यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस म्हणाले.









