वर्धा येथे करण्यात आले कम्युनिटी स्पोर्टस् डे चे आयोजन
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : दोन दिवसीय कम्युनिटी स्पोर्ट डे चे यशस्वी आयोजन एव्होनिथ स्टीलच्या वर्धा प्रकल्पात करण्यात आले,ज्यामुळे समाज कल्याण, शारीरिक तंदुरुस्ती आणि सामाजिक समावेशकता यांप्रती असलेली आपली वचनबद्धता अधिक दृढ झाली.या उपक्रमामुळे आसपासच्या २० गावांमधील लाभार्थी एकत्र आले आणि क्रीडा, सलोखा व सामूहिक सहभागासाठी एक उत्साही व्यासपीठ निर्माण झाले.या कार्यकमात खो-खा, कबड्डी आणि क्रिकेटसह विविध पारंपरिक आणि लोकप्रिय खेळांचा समावेश होता, ज्यामुळे सर्व वयोगटांतील परुष आणि महिलाना सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळाले.
१,००० हुन अधिक लाभार्थी सहभागी झाल्यामळ, गल्या वषाच्या तलनत सहभाग जवळपास दुप्पट झाला, ज्यामुळे स्थानिक समाजामध्ये खेळ आणि शारीरिक हालचालींबद्दल उत्साह वाढलेला दिसून येतो. गावकऱ्यांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने या कार्यक्रमाचे यश दिसून आले आहे.इव्होनिथ स्टीलचे अध्यक्ष जय सराफ म्हणाले,या उपक्रमाने ग्रामीण तरुणांमध्ये सक्षमीकरण, लैंगिक समावेशकता आणि आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला.महिला आणि तरुण सहभागींना सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणारे सर्वसमावेशक वातावरण निर्माण करून, या कार्यक्रमाने टीमवर्क, समानता आणि आत्मविश्वास या मूल्यांना बळकटी दिली.









