आरोग्य उपसंचालकांनी घेतला जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशीकांत शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील आराग्य व्यवस्थचा आढावा घेण्यात आला. आरोग्य सेवांचा दर्जा अधिक सक्षम व प्रभावी करण्यासाठी समन्वयान काम करण्याच निदश त्यानी यावेळी त्यांनी दिले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुमंत वाघ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नलीनी विखे, जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डा.रा.ज. पराडकर, जिल्हा क्षयराग अधिकारी डॉ. हेमंत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनतकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना पवार तसेच नागपूर परिमंडळातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात आयोजित बैठकीत डॉ. शशीकांत शंभरकर यांनी माझं गाव आरोग्य संपन्न गाव, एचपीव्ही लसीकरण, पॅलिएटीव्ह केअर, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन, ई-संजीवनी, सावत्रिक लसीकरण या विषयावर सखोल चर्चा करुन सर्व संबंधित अधिका-यांना आवश्यक सुचना दिल्या. तसेच क्षेत्रीय स्तरावरर अधिक गतीने काम करण्यावर भर देऊन नागरिकांना गुणवत्तापूर्ण आराग्य सवा उपलब्ध करुन दण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन डॉ. शंभरकर यांनी केले. बैठकीला आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.








