मंकीपॉक्सकरीता आरोग्य विभाग दक्ष

वर्धा/प्रतिनिधी मंकीपॉक्स आपल्या देशात, राज्यात किंवा जिल्ह्यात अद्यापपर्यंत आलेला नाही. मात्र या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या देशातुन परत आलेल्या प्रवासी नागरीक यासंदर्भात काही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा तसेच आपल्या कार्यक्षेत्रात मंकीपॉक्स सर्व्हेक्षण प्रतिबंधात्मक व नियत्रणात्मक उपाययाजना अंमलात आणाव्यात असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर यांनी केले आहे. सद्या जगातील विविध देशात मंकीपॉक्स या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स आजारास आरोग्य आणीबाणी म्हणुन जाहिर केली आहे.

यासाठी राज्य शासनाकडून खबरदारीसाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य विभाग मंकीपॉक्स आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्ष असल्याचे जिल्हा आरोग्यअधिकारी यांनी सांगितले. आरोग्य विभागाने उपाययोजनाकरण्यास सुरवात केली असुन गेल्यातीन आठवड्यापासुन मंकीपॉक्स बाधीत देशातुन प्रवास करुनआलेल्या नागरिकांचे आरोग्यविभागामार्फत विमानतळावर वबंदरावर सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आले आहे.

मंकीपॉक्स आजार हा ऑर्थो पॉक्स या डीएनए प्रकारच्याविषाणूमुळे होतो काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये हाविषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्तोत्र आहेत. अंगावर पुरळ उमटण्यापुर्वी १ते २ दिवसापासून ते त्वचेवरील फोडावरील खपल्या पडेपर्यंत किंवात पर्णपणे मावळेपर्यंत, बाधीत रुग्णअन्य व्यक्तीसाठी संसर्गजन्य असतो.मंकीपॉक्स प्रामुख्याने माणसापासुनमाणसाला होणारा संसर्ग आहे.शारीरीक संपर्क, शरीरद्रव्य, लैगिंकसंपर्क किंवा जखम याव्दारे याविषाणूचा संपर्क होतो. संसर्गझालेला प्राणी चावल्याने सुध्या विषाणूचा संपर्क होतो.

संशयीत रुग्णाची लक्षणे :अचानक अंगावर पुरळ येणे, ताप येणे, डोके दुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा, घसा खवखवणे आणिखोकला येणे, लसीका ग्रंथीवर सुजयेणे, कुपोषण, कृमी प्रादुर्भाव होप्रतिकार शक्ती कमी असलेल्यारुग्णामध्ये हा आजार गंभर स्वरुप धारण करु शकतो त्यामुळेन्युमानिया, सेप्सीस, मेंदूतीलगुंतागुत व दृष्टी पटलाचा संसर्ग अशाइतर संसर्गाची गुंतागुत होऊ शकते. प्रतिबंधात्मक उपाययोजना: संशयीत मंकीपॉक्स रुग्णालावेळेत विलगीकरण, रुग्णाच्याकपड्याची अथवा पांघरणाशी संपर्कटाळावा व वारंवार हात धुवावे. असे जिल्हा आरोग्य विभागानेकळविले आहे.