राज ठाकरे २० ऑगस्टपासून विदर्भ दौऱ्यावर!

अकोला/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत महायतीला बिनशत पाठिंबादेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आगामी विधानसभा निवडणूकीवरलक्ष केंद्रित कल आह. मनसआगामी विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढवणार आहे.त्यासाठी मनसेकडून जोरदारमोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतःसंपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणारआहेत. नुकताच मराठवाडा दौरा राज ठाकरे यांनी केला. यानंतर आता मनसे अध्यक्ष विदर्भ दौरा करणार आहे. मराठवाड्यानंतरराज ठाकरे हे २० ऑगस्टपासून विदर्भाच्या दौरावर असणार आहेत.राज ठाकरेंच्या दौऱ्याचा कार्यक्रमजाहीर झाला आहे. त्यामुळेमराठवाड्यानंतर आता विदर्भात या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतोहे पाहावे लागणार आहे. २८ऑगस्टला राज ठाकरे हे अकोलादौऱ्यावर येणार आहेत.

राज्यात लवकरच विधानसभानिवडणुकीचा बिगुल वाजणारआहे. त्यापूर्वी पक्ष संघटनाताकदीने कामाला लागल्या आहेत.यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही माग नाही. लाकसभा निवडणकीतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्तपाठिंबा मनसेकडून देण्यात आलाहोता. आता आगामी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याचा नारा मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यासाठराज्यातील सर्वच मतदारसघावमनसेकडून लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे हे स्वतः संपूर्ण राज्याचा दौराकरणार आहेत.

राज ठाकरे यांचा नकताच मराठवाडा दौरा पापडला. हा दौरा चांगलाच गाजला.या दौऱ्यादरम्यान आमदार अमोलमिटकरींची गाडी फोडण्याचीघटना असेल किंवा धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राजठाकरे यांच्या विरोधात केलेली घोषणाबाजी. तसेच त्यानंतर बीड मध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेको आंदोलन. राज ठाकरेमराठवाडा दौऱ्यावर असतानाअनेक ठिकाणी त्यांनी घेतलेले प्रेसकॉन्फरन्स आणि दौऱ्यानिमित्ताने काही लोकांनी केलेले आंदोलन यामुळे राज ठाकरे यांचा दौराचांगलाच गाजला. त्यामुळे आताआगामी विदर्भ दौऱ्यात देखीलकाय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.