इकडून झाडे लावली, जनावरांनी तिकडून खाल्ले!

वर्धा/प्रतिनिधी वर्धा शहर मोठे मजेशीर आहे. येथील विकास कोणालाच पहावल्या जात नाही. वर्धेच्या विकासाला गेल्या आडेआठ वर्षात चालना मिळाली. रस्ते चकाचक झाले. दुभाजकंही चांगलेच बहरू लागले. आता त्यात पुन्हा नगर पालिकेच्या वतीने झाडं लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पण, हा विकास जनावरांनाही पाहावल्या गेला नाही. चक्क काल लावलेली झाडं जनावरांनी ओरबडून खाल्ली… अमृत योजनेत केलेल्या गटार योजनेतील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. त्या रस्त्यांवर डांबराचा थर टाकला. पण, तोही कुठे उडून गेला कळले नाही. याशिवाय वर्धेला आता शहराचे रूप येऊ लागले आहे. दादाजी धुनिवाले चौक ते पावडे नर्सिंग होम हा शहरातील पहिला सिमेंटीकरण झालेला रस्ता आणि तो अजूनही भेगा विरहीत आहे. आर्वी नाका ते जुनापाणी चौकापर्यंतचाही रस्ता मोठा झाला.

रस्त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी रस्ता दुभाजकांमध्ये बोगनवेली लावण्यात आल्या तर काही ठिकाणी रूईचेही झाडं उगवल्याने तेही सौंदर्यात भर टाकत होते. गेल्या आठवड्यापासुन दादाजी धुनिवाले, आर्वी मार्गावरील रस्ता दुभाजकांमध्ये मोठाली झाडं लावण्याची मोहीम राबवली जात आहे. एक दिवसापूर्वी आर्वी नाका परिसरात झाडं लावण्यात आली. त्या झाडांनी माना टाकू नये म्हणून त्याला कमच्याही लावण्यात आल्या. मात्र, दुसर्या दिवशी मुक्या प्राण्यांनाही हा विकास पाहावल्या गेल्या नाही. रस्त्यावर फिरणार्या मोकाट बैलाने चक्क रस्ता दुभाजकावर चढून नव्याने लावलेल्या झाडाचा आनंद घेतला.

वर्धेत सेवाग्राम विकास आराखड्याशसह अनेक कामं चांगली केली जात आहेत. थरीवहर-ऊर्शींशश्रेिाशपीं परंतु, त्याच्या देखभाल दुरुस्तीचा विचार केल्याच जात नसल्याने पुन्हा ती जैसे थे परिस्थिती होऊन जाते. रस्ता दुभाजकांमध्ये लावलेल्या झाडांभोवती कठडे न लावल्यास पुन्हा झाडं लावण्याची मोहीम वारंवार राबवावी लागेल. दोन फुट रूंद असलेल्या रस्ता दुभाजकांमध्ये पामची मोठ्ठाली झाडं नपकडून मेहनत करीत लावल्या जात आहेत. परंतु, ती झाडं त्या छोट्या रोड दुभाजकात तग धरेल का असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.