विधानसभेत भारत आघाडीला पाठिंबा- योगेंद्र यादव

वर्धा/प्रतिनिधी महात्मा गांधींच्या भूमीत रा. स्व. संघ आणि भाजपविरोधातील लढा तीव्र करण्याचा संकल्प केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला पाठींबा दऊ अशी माहिती भारत जोडा अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांनी ९ रोजी सेवाग्राम येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भारत जोडो अभियानाचे मार्गदर्शक तुषार गांधी, विजय महाजन, कविता कुरुगंटी उपस्थित होते. योगेंद्र यादव पुढे म्हणाले की, या परिषदेत दोन मोठे ठराव व प्रस्ताव घेण्यात आले आहेत.

पहिला प्रस्ताव देशाच्या राजकीय परिस्थितीबद्दल आहे. पुढील तीन-चार महिन्यांत महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा आणि काश्मीरमध्ये जिथे जिथे निवडणुका होतील तिथे प्रचाराचा दुसरा प्रस्ताव आहे. आम्ही देशात संविधान समर्थक विचारधाराअसलेल्या लोकांना एकत्र करून संविधान समर्थक तयार करू. भारत जोडो अभियानाने लोकसभेच्या १६५ जागा लढवल्या होत्या. त्याचेही मूल्यमापन या परिषदेत झाले आहे. या निवडणुकीत जनतेने लोकशाहीविरोधी आणि जातीयवादी शक्तींर्ना हादरा दिल्याचे आम्हाला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतून भाजपाला धडा शिकू, अशी प्रतिज्ञा केली होती. तो धडा शिकवण्याची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. मात्र, यासोबतच वैचारिक लढाही सुरूराहणार आहे. आमची लढाई कोणा एका व्यक्तीशी, मोदींशी, कोणत्याही एका पक्षाशीनाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.