हजारो वर्धेकर “ऑन सायकल व्हील्स’ – भूषण वानखेडे

वर्धा : एरवी रस्त्यांवरून सुसाट धावणार्या दुचाकींर्ची गजबज दृष्टीस पडते. मात्र, रविवारची सकाळ सायकलवर स्वार झालेली दिसून आली. निमित्त होते सायक्लॉथॉनचे. या सायकल रॅलीत हजारोंच्या संख्येने वर्धेकर चिमुकले, तरुण, तरुणी, महिला आणि पुरुषांनी स्वयंस्फूर्तपणे सहभागी होत धकाधकीच्या या जीवनात सुदृढ आरोग्य राखण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यंग सायकल रायडर्स (वायसीआर) च्यावतीने या अभिनव उपक्रमाचे डॉ. सचिन पावडे, एवोनिथ स्टील, मक्यर्ुरी सलूनच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले.

सायकल रॅलीचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. सचिन पावडे, एवोनिथच आर. के. शमा, अभय राजद्र डागा यांच्या हस्ते झाले. यावेळी वायसीआरचे अध्यक्ष पंकज सराफ, सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती. सायकल रॅलीला डॉ. आंबेडकर पुतळा येथून सुरूवात झाली. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, व्हीआयपी रोड, दादाजी धुनिवाले चौक, आर्वी नाका, शिवाजी चाक, बजाज चाक, शास्त्री चाक, वंजारी चौक, आर्वी नाका असे मार्गक्रमण करीत विठ्ठल रुक्मिणी सभागृहात समारोप करण्यात आला. यावेळी बायसिकल मेयर ऑफ नागपूर डॉ. अमित समर्थ, डॉ. सचिन पावडे, राकेशचौधरी, सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती.