शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा

मुंबई/प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीलामोठा धक्का बसला आहे. यानिवडणुकीत ४ जागा लढवणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळएका जागेवर यश मिळवता आलं.तसंच बारामतीत अजित पवारयांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनातब्बल दीड लाख मतांच्या फरकानेमानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर शरद पवार याची साथ सोडनअजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार आमच्या पक्षात येण्यासाठीइच्छुक असल्याचा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून केला जातआहे. मात्र हा दावा खोडून काढतशरद पवारांच्या पक्षातीलच दोन ते तीन आमदार आमच्यासोबतयेणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचेविधानपरिषद आमदार अमोलमिटकरी यांनी केलं आहे. अमोल मिटकरी म्हणालेकी, लोकसभा निवडणुकीच्यानिकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटातील नेत्यांकडूनपक्षांतराबाबत अफवा पसरवल्या जात आहेत.

या बाष्कळ गप्पा असून या अफवांना काही आधार नाही. त्याउलट गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर शरदपवार गटातील काही आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला असून पावसाळी अधिवेशनापर्यंत शरदपवार गटातीलच दोन ते तीनआमदार हे आमच्यासोबत येणार आहेत, असा दावा मिटकरी यांनी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातीलविधानसभा निवडणूक अवघ्याकाही महिन्यावर यऊन ठपलआहे. या निवडणुकीपूर्वी कोणत्यापक्षातील आमदार पक्षांतर करणआणि कोणाचे आमदार आपल्या नेत्याला ठामपणे साथ देणार,याबाबतचं चित्र लवकरच स्पष्टहोणार आहे.