बारावीचा निकाल जाहीर मुलींनी मारली बाजी

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांत हा निकाल देण्यात येणार आहे. दरम्यान, या परीक्षेत यावर्षी कोकण विभागाने बाजी मारली आहे.

कोकण विभागातील एकूण ९७.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मराठवाड्यातील लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील निकालदेखील ९० टक्क्यांचा वर लागला आहे. या वर्षी एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. यातील १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले आहेत. यावेळी मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर विभागातील एकूण ९४.०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल आहत. तर लातर विभागाचा ९२.३६ टक्के निकाल लागला आहे.