विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

मुंबई/प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा विधानसभेत केली. त्यानंतर सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थित मंत्री आणि विधानसभा सदस्यांनी श्री.वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विरोधी पक्षनेते श्री.वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.