दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात ५.४ तीव्रतेचा भूकंप; पाकिस्तानतही जाणवले झटके

नवी दिल्ली/प्रतिनिधी आज(दि.१३) दुपारी दीडच्या सुमारास भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव होता. भारतातभूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मूकाश्मीरमधील डोडा येथे होता. त्याची खोली जमिनीच्या आत ६ किलोमीटर होती. हे धक्केबराच वेळ जाणवत होते.मात्र, आतापर्यंत भारत किंवापाकिस्तानातून कोणत्याहीप्रकारच्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. पाकिस्तानात भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.२ इतकी मोजली गेली आहे. याआधी मार्च महिन्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.६ इतकी होती. दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, हिमाचल, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचा प्रभाव होता. अफगाणिस्तानचा हिंदुकुश प्रदेश भूकंपाचा केंद्रबिंदू होता.