गिरड परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

गिरड/प्रतिनिधी ऐन खरीपाच्या तोंडावर गिरड परिसरात शनिवार २७ रोजी सायंकाळी झालेल्या वादळीवार्यासह गारपीट आणि पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी विद्युत खांब व मोठमोठी झाडे उन्मळून पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेक शेतकरी या वादळातून थोडक्यात बचावले. दरम्यान, फरीदपूर व आर्वी येथे मुख्य वीज लाईनचे ६ खांब पडल्याने मोहगाव आणि तावी या दोन्ही गावाचा रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शेतकरी शेतामध्ये काम करून घराकडे परत जात असतानाच अचानक वादळी वार्यासह गारपीट झाली.

त्यामुळे अचानक शिवारात असलेल्या शेतकर्यांची मोठी तारांबळ उडाली. वार्याचा वेग इतका जास्त होता की या वादळामुळे गिरड, आर्वी, पेठ, फरीदपूर, मोहगाव या शिवारातील अनेक शेतकर्यांचे शेतातील बंड्यावरील टिना उडाल्या तर काही बंडे जमिनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी मोठ मोठी झाडे कोलमडून पडली. या वादळामुळे अनेक शेतातील व गावात वीज पुरवठा करणारे विद्युत खांब कोलमडून पडले. मोहगाव फिडरवरील फरीदपूर व आर्वी येथे ६ खांब पडल्याने मोहगाव व तावी या दोन्ही ठिकाणचा रात्रभर वीज पुरवठा खंडित झाला होता. गिरड येथील शेतकरी युवराज तीन पलट्या खाऊन बैलगाडीचे वत्यांच्या शेतातील बंड्याचे तसेच त्यांच्या मालकीचे १५ सागाचेझाडे कोसळून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. यावेळी तिघेही बैलगाडीतून बचावले.

नंतरत्यांनी झाडा खाली आसरा घेतला.मात्र, काही क्षणातच ते झाडही जमिनदोस्त झाले. सुदैवाने तिघेहीथोडक्यात बचावले. नुकसानीचे पंचनामे करून तसेच शेतामधील पडलेले विद्युत खांब तातडीनेउभे करण्याची मागणी मोहगावचे सरपंच विलास नवघरे, गिरडचे बावणे, त्यांची पत्नी व मुलगा सरपंच राजू नौकरकर, उपसरपंच शेतामध्ये काम करीत असताना कडब्याने भरलेल्या बैलगाडी चक्क मंगेश गिरडे, फरीदपूरचे सरपंच धाडसे आदींनी केली आहे.