मुंबई महापालिका निवडणुका ऑगस्टपर्यंत होणार नाहीत, वॉर्ड फेररचनेवर आता थेट ऑगस्ट महिन्यात सुनावणी

मुंबई/प्रतिनिधी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड संख्येबाबत सुप्रीम कोर्टातलं प्रकरण थेट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीसाठी येणार आहे. त्यामुळे बीएमसी महापालिका निवडणुका तोपर्यंत लागणार नाहीत हे देखील स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टाने आज वॉर्ड संख्येतील कधी होणार याची उत्सुकता गेल्यावर्षांपासून मुंबईकरांना आहे.खरंतर फेब्रुवारी २०२२ मध्येमुंबई महापालिकेची मुदत संपली. त्यामुळे फेब्रुवारी २०२२ मध्येहोणाऱ्या मुंबई महापालिकांच्यानव्या निवडणुका कुठल्या प्रभाग संख्येनुसार होणार २२७ की २३६ हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. बदलाबाबत बीएमसी आणि राज्य महाविकास आघाडी सरकारने सरकारला नोटीस बजावली आहे. ९२ नगर परिषदांसंदर्भात जे प्रकरण प्रलंबित आहे त्यासोबत हे प्रकरण जोडण्याची विनंती करण्यात आली होती पण कोर्टाने ही याचिका स्वतंत्र ठेवली आहे.

मुंबई महापालिका निवडणुका बीएमसी वॉर्ड संख्या २२७ वरुन २३६ केली. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारनेही वॉर्ड संख्या पुन्हा २२७ केली. लोकसंख्येच्या आधारावर वॉर्डसंख्या वाढवल्याचं महाविकासआघाडी सरकारने म्हटलं होतं.पण हायकोर्टाने शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय मान्य करत कायम ठेवला होता. त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. सुप्रीम कोर्टात आज या प्रकरणावर सुनावणी झाली त्यावेळी काही युक्तिवाद झाले. निवडणूक नियम सांगतो की, आधीच्या जनगणनेनुसार वॉर्ड संख्या ठरवावी लागते. त्यामुळे २००१ च्या जनगणनेनुसा २२७ ही वॉर्ड संख्या होती.

२०११ च्या जनगणनेनुसार आपण २३६ केली असा युक्तिवाद मविआकडून करण्यात आला. त्याला महाधिवक्ता तुषार मेहता यांनी उत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी काही वेळ युक्तिवाद झाला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावली. आता प्रकरण थ ेट आ ॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीसाठी येणार आहे.