२०४७ साली भारत बनेल महासत्ता, अर्थव्यवस्था असेल सर्वात मोठी- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

पुणे/प्रतिनिधी “”संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरच्या दिशेने उचलण्यात येत असलेल्या पावलामुळेआज भारतात रायफलपासून ते ब्राह्मोसक्षेपणास्त्रांपर्यंत आणि हलक्या लढाऊविमानापासून स्वदेशी जहाजापर्यंत सर्वकाही निर्माण करण्यात येत आहे. यामुळे लहान-मोठ्या अशा प्रत्येक तंत्रज्ञानातआपण पुढे येत आहोत. अशाच प्रकारेआपण आपल्या क्षमतांचा वापर केल्यास येत्या २०४७ पर्यंत भारत हा जगातीलविकसित देश म्हणून उदयास येईल. तसेच अर्थव्यवस्थेत ही आपण पुढे असू, असे मतसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. संरक्षण संशोधन आणि विकाससंस्थेच्या (डीआरडीओ) अंतर्गत येणाऱ्या खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (डीआयएटी) १२व्या दीक्षान्त सोहळ्या दरम्यान ते बोलत होते.

या प्रसंगी डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.समीर व्ही कामत, डीआयएटीचे कुलगुरू डॉ.सी.पी.रामनारायणन आदी उपस्थित होते. यावेळी डीआयएटीच्या २८३ विद्यार्थ्यांनपदवी प्रदान करण्यात आली. त्यातील २६१विद्यार्थी हे एम.टेक आणि एम.एस्सी चे तर २२ पीएचडी विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच २० विद्यार्थ्यांना यावेळी सिंह यांच्या हस्ते सुवर्ण पदकांने गौरविण्यात आले.यावेळी सिंह म्हणाले, “”संरक्षण उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व हे देशाच्या धोरणात्मक स्वायत्ततेमध्ये अडथळा ठरू शकतो. या अनुषंगाने आत्मनिर्भरता मिळविण्याकरिता सरकारद्वारे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आत्मनिर्भरतेशिवाय आपण आपल्या राष्ट्रीय हिताच्या अनुषंगाने जागतिक समस्यांवर स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही.

त्यामुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याबरोबरच आपल्या उत्पादनांच्या निर्यातीवर अधिक भर देण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यामुळे केवळ आपली अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही, तर रोजगाराच्या संधीही वाढतील. डीआरडीओच्या ५० हून अधिक प्रयोगशाळा विविध क्षेत्रातील संशोधन करत आहे. तर डीआयएटीने देखील संरक्षण क्षेत्रासाठी अशा विविध तंत्रज्ञानाच्या विकासात प्रयत्न केले आहेत. परंतु यामध्ये अधिक गती आणण्याची गरज आहे.” अशा कित्येक प्रणाली आहेत ज्या सुरवातीला संरक्षण क्षेत्रांसाठी विकसित करण्यात आल्या मात्र आता त्याचा वापर मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरिकांद्वारे ही केला जात आहे. त्यामध्ये दिशानिर्देशक प्रणालीचा समावेश आहे. त्यामुळे संरक्षण आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल अशा नावीन्याचा प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यावेळी कामत म्हणाले, “”विविध क्षेत्रातून पदवी मिळविल्यावर त्याचा देशासाठी कसाउपयोग होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

जागतिक स्तरावर भारताला तांत्रिक क्षेत्रातील नेतृत्व करणारे देश म्हणून स्थापितकरणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी पुढील २५ वर्षे अत्यंत महत्त्वाचे आहेत.” दीक्षान्त सोहळ्यानंतर सिंह यांनीडीआयएटीमध्ये केलेल्या विविधआघाडीवरील संशोधन प्रकल्पांची पाहणी केली. यामध्ये बायोमेडिकल हेल्थ-केअर उपकरण, ड्रोन इंटरसेप्शन आणि लढाऊ तंत्रज्ञान, न्यूक्लिअर डायमंड बॅटरी आदींचासमावेश होता. मागील काही दशकांमध्ये जागतिकपातळीवर मोठे बदल घडत असूनयामध्ये सर्वाधिक वेगाने युद्धाचे स्वरूपबदलत आहे. पारंपरिक युद्धाच्याधोक्यांबरोबरच आता सायबर आणि अवकाशडोमेनमधील धोक्यांचा ही सामना करावा लागत आहे. त्यात “कॉन्टॅक्टलेस’ युद्धाचे स्वरूप यामुळे संरक्षण क्षेत्रात आधुनिकतंत्रज्ञानाची गरज अधोरेखित होत आहे. अशात आपल्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञान असलेलेशत्रू देश हे आपल्या देशासाठी चिंतेचे कारणठरू शकते. यासाठी अशा आव्हानांनातोंड देण्याऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी नावीन्याची गरज असल्याचे सिंह यांनीनमूद केले.