वनमंत्री मुनगंटीवार यांच्याकडून सचिन तेंडुलकरला वाघाची प्रतिकृती व डायरी भेट

चंद्रपूर/प्रतिनिधी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष पाहुणे म्हणून मुक्कामी आहेत. वन मंत्री मुनगंटीवार यांनी शनिवारी स्वतः चे विशेष दुत पाठवून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचे वाघाची प्रतिकृती व सचिन तथा त्याच्या आईचे छायाचीत्र असलेली स्पेशल डायरी देवून स्वागत केले. ताडोबात सचिन दोन दिवसापासून पत्नी अंजली व मित्रांसोबत मुक्कामी आहे. ताडोबात अलिझझा शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके, स्कूल बॅग तथा इतर साहित्य भेट दिले.

जंगल सफारीमध्ये छोटी तारा, अस्वल, तथा इतर वाघांचे दर्शन दिले. त्यानंतर मुनगंटीवार यांच्या वतीने सचिनचे विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी मुनगंटीवार यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना काही भेटवस्तू देण्यात आल्या त्यामध्ये वाघाची प्रतिकृती व एक बांबू डायरी देण्यात आली.