रुग्णमित्र गजू कुबडे यांचे आज प्रायश्चित्त आंदोलन

हिंगणघाट/प्रतिनिधी शहरात अनेक वर्षांपासूनआरोग्या बाबत सामान्य नागरिकांचीहोत असलेली हेळसांड पाहूनरुग्णमित्र गजू कुबडे यांनी सोमवार २४ रोजी उपविभागीय कार्यालयापुढअनवाणी पायाने उन्हात उभे राहत प्रायश्चित्त आंदोलन करण्याचा निर्णयघेतलेला आहे. या संदर्भात वैद्यकीयअधिकार्यांना पाठविलेल्या निवेदनातनमुद केल्याप्रमाणे एक लाखाच्या वरलोकसंख्या असलेल्या हिंगणघाटातरुग्णसोयी अजिबात नाहीत.गावाबाहेरून गेलेल्या राष्ट्रीयमहामार्गावर उपजिल्हा रुग्णालयाचीएक मोठ्ठी इमारत या गावाची शोभावाढवीत आहे. सोनोग्राफीची मशीनदोन वर्षांपासून बंदच आहे. या मुळेया गावातील गर्भवती महिलां तसेचपोटाचे आजार असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी एकतर सेवाग्राम, सावंगी किंवा नागपूर येथे जाऊन उपचार करावा लागतो.

या संपन्न असलेल्या शहरातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांच्या आरोग्याची होणारी हेळसांड थांबावी यासाठी अनेकदा सक्षम अधिकार्यांना वेदन देऊन छोटी मोठी आंदोलनेही केली आहे. उपजिल्हा रुग्णालया समोर तीन दिवस अन्नत्यागआंदोलनही केले. परंतु, त्याचाकोणताही परिणाम या सुस्तावलेल्यायंत्रणेवर झाला नसल्याने आताआरोग्याची कुचकामी व्यवस्थावेदनादायी असल्याने सोमवार २४ रोजी मोकळ्या मैदानात दिवसभर अनवाणी पायाने उभा राहून प्रायश्चित्तआंदोलन करण्याचा निर्णय घेतलेलाअसल्याचे नमुद केले आहे.