जादूटोणा विरोधी कायदा संत आणि डॉ. बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करेल- वंजारे

हिंगणघाट/प्रतिनिधी अंधश्रद्धा निमर्ूलन ही वैचारिक प्रक्रिया आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन, विवेकवाद रुजवत आणि कृती करत ती पुढे जाते. यातून प्रश्न विचारणारा , चिकित्सक, मानवतावादी समाज निर्माण होतो .असा समाज घडावा, या उद्देशाने संत आणि अनेक महापुरुषांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड कार्य केले. समाजात प्रचार – प्रसार आणि पोलिसांकडून योग्य अंमलबजावणी झाल्यास जादूटोणा विरोधी कायदा संत आणि डॉ.बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध युवा वक्ते तथा अ.भा.अंनिस महाराष्ट्र राज्य युवा संघटक पंकज वंजारे यांनी केले. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव- २०२३ अंतर्गत मिलिंद सांस्कृतिक मंडळ आणि शाक्य मुनी महिला मंडळ, हिंगणघाट यांच्या वतीने स्थानिक मिलिंद नगर येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणात आयोजित जाहीर व्याख्यानात ह्य संत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयवार बोलत होते.

प्रचंड र्शोत्याच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानाच्या विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून अ.भा.अंनिस वर्धा चे जिल्हा सचिव निलेश गुल्हाने, हिंगणघाट तालुका सचिव मनोज गायधने उपस्थित होते. पुढे बोलतांना पंकज वंजारे यांनी विविध संतांचे प्रबोधन करणारे अभंग , संत रोहिदास, कबीरांचे दोहे मांडत वर्तमानात सुरू असलेल्या बाबा , महाराज यांची बुवाबाजी, अनिष्ट प्रथांवर प्रहार केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संत साहित्याचा समाज जागृतीसाठी कसा आधार घेतला, संत गाडगेबाबा , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याकडून त्यांच्या कायार्ला व धम्मक्रांतीला कसा पाठींबा होता, याचे त्यांनी विविध संदर्भ दिले. संत आणि महापुरुषांना जाती धर्मात, रंगात वाटू नका , असे उपस्थितांना आवाहन करत जादूटोणा विरोधी कायदा चमत्कार प्रात्यक्षिकांसह वंजारे यांनी समजून सांगितला.

यावेळी प्रमुख पाहुणे निलेश गुल्हाने यांनी अ.भा.अंनिस चळवळीची देव झ्र धर्म विषयक भूमिका विशद करून समितीच्या कायार्चा परिचय आणि आव्हानप्रक्रिया स्पष्ट केली.प्रारंभी मनोज गायधने यांनी प्रास्ताविकातून वक्त्यांचा आणि प्रमुखअतिथीचा परिचय करून दिला.यावेळी कार्यक्रमाचे संचालन निलेश फुलझेलेयांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल कुत्तरमारे यांनी करून आभार निशांत भगतयांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीमोहनंद गायधने, निखिल कुत्तरमारे,विशाल कांबळे, सुमित तेलतुंबळे, विक्की पाटील,सुमित बुरबुरे, नवीन ठोंबरे, शैलेशलोखंडे, प्रशिक कांबळे, तेजस बुरबुरे, रोहिट धवणे, कुंताबाई कांबळे, अल्का थुल, मयुरी पाटील, प्रणिता अलोणे,बेबीताई वावरे, ललिता वावरे, अनिता भगत यांचेसह अ.भा.अंनिस युवा शाखा वर्धा जिल्हा सदस्य संदीप लटारे, हिंगणघाटतालुका युवा शाखा सचिव मयुर आंबेकर आदींनी परिश्रम घेतले.