नियोजनबद्ध कार्यशैलीने काम केल्यास विकास करणे शक्य- खा. रामदास तडस

वर्धा/प्रतिनिधी गावाचा कायापलट व्हावा अशी मनोमन सर्वांची ईच्छा असते व प्रयत्नही करतो परंतु परिपूर्ण माहिती, अभ्यास व पाठपुरावा नसल्यामुळे ईच्छा असून सुद्धा गावास न्याय देवू शकत नाही. कुठल्याही कामाची सुरुवात करण आणि ते काम तडीस घेवून जाण सोप नसते, गांवचे सरंपच व सर्व सदस्यांनी बरबडीच्या विकास कामाला महत्व देवून पाठपुरावा करुन कामे मंजुर केली आहे, विकासकामाच्या माध्यमातून गावाचा चेहरा मोहरा बदलत असतो. नियोजनबद्ध कार्यशैलीने काम केल्यास विकास करणे शक्य आहे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी बरबडी येथे विविध कामाचे लोकार्पण करताना व्यक्त केले. बरबडी येथे खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत संत गजानन सभागृह ते स्मशानभूमी पर्यन्त रोड लाईट व ओपन जीमचा लोकार्पण सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. संगीताताई शिंदे, माजी पं. समिति सदस्य सौ. मंगलाताई मुडे, संदीप मुडे, मधुकर केळवतकर, निलेशभाऊ तिजारे, सदर कार्यक्रमाचे संचालन निखिलेश केळवतकर यांनी केले तरउपस्थितांचे आभार अभिजीतसिंग मेहर ग्र. पं. सदस्य यांनी मानले.

यावेळी मुरलीधर मुडे, मयूर मुडे, विशाल लाडे, दिपक शेंडे, मधुकररूमाले, दासरवार साहेब, दिपक लेंडे, रविंद्र लाडे, गजानन शिंदे, अजय गाऊत्रे, रविंद्र महाजन,विलास मुन, दामोधर देशमुख,लोकेश, प्रतिक, रूपेश केळवतकर,दामोधर देशमुख, देवराव भलमे, चंदू रुमाले, प्रज्ञाताई झामरे, मंगला प्रमोदभाऊ चव्हाण, रामभाऊ देशमुख तसेच भाजपा सदस्य, शिवरकर, देवानंदजी कांबळे उपस्थित होते. पदाधिकारी व मोठ्या संख्येनेनागरिक उपस्थित होते.