शेतकरी लॉन्ग मार्च मृत्यू प्रकरणी पाच लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा धनादेश सुपूर्द

मुंबई/प्रतिनिधी नाशिकहून निघालेल्या शेतकरी लॉन्ग मार्चमधील मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर मदत देण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमी दादर या ठिकाणी भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत उपस्थित शेतकरी लॉन्ग मार्च मध्ये निधन झालेल्या शेतकऱ्याच्या नातेवाइकांस पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही महिन्यापूर्वी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील लाल वादळ मुंबईच्या दिशेने निघाले होते. शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हा लॉन्ग मार्च मुंबईला निघाला होता. तब्बल सात दिवसांच्या प्रवासानंतर शेतकरी लॉन्ग मार्च शहापूरपर्यंत पोहचला होता. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ आणि लॉन्ग मार्चमधील नेतृत्वाची बैठक झाली होती. याच दरम्यान दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील पुंडलिक दादा जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. जाधव यांना अस्वस्थ वाटू लागल्यान े त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी मंत्री दादा भुसे यांनी मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचे सांगितले होते.
दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील शेतकरी पुंडलिक जाधव यांचा वाशिंदमध्ये मृत्यू झाला. १७ मार्च रोजी जाधव त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मोर्चेकऱ्यांनी त्यांना तातडीने शहापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः या घटनेची माहिती दिली. या मृत्यूनंतर त्यांच्या गावाकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमच्या मागण्याअगोदरच मान्य केल्या असत्याआणि त्याची अंमलबजावणी केली असती तर ही वेळआली नसती अशा भावनाशेतकऱ्यांनी व्यक्त केल्याआहेत.
तसेच आमचा शेतकरीबांधवाचा मृत्यू झाला, त्यालाशासनाने आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी पुंडलिकजाधव यांच्या गावकऱ्यांनीकेली आहे. मृत शेतकऱ्याच्याकुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यतानिधीतून पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी माहिती दादा भुसे यांच्यावतीने दिली होती. आज मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी पाच लाख रुपये दिले आहेत.