बजाज चौक येथील उड्डाण पुलाच्या रुंदीकरणाचे कार्य ३ ते ४ महिन्यात पुर्ण होतील असे नियोजन करावे; खासदार रामदास तडस यांच्या सुचना

वर्धा/प्रतिनिधी बजाज चौक येथील आर्वी वर्धा वायगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २६७ वरीलआचार्य विनोबा भावे पुलावर अस्तीत्वास असलेल्या रेल्वे मार्गावर उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे कार्य अंतिम टप्प्यात असुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कार्य सुरु आहे, सदर रुंदीकरणाचे कार्य पुढील ३ ते ४ महिन्यात पुर्ण होतील असे नियोजन करण्याच्या तातडीने पुर्ण करावे, तसेच कामा संदर्भात अडचणी येत असले तर त्याबाबत सोडविण्याचे प्रयत्न करुअसे उपस्थित अधिकारी वर्गाला खासदार रामदास तडस यांना सांगीतले वर्धा येथे आर्वी वर्धा वायगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २६७ वरील आचार्यविनोबा भावे पुलावर अस्तीत्वास असलेल्यारेल्वे मार्गावर उड्डाणपुल रुंदीकरण कार्याचाप्रत्यक्ष आढावा घेण्याकरिता व तांत्रीक बाजु समजुन घेण्याकरिता खासदार रामदास तडस यांनी उड्डाणपुलाच्या कामाची प्रत्यक्षपाहणी केली.
उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजुचे पोच मार्गाचे काम पुर्ण झाले असुन फक्त रेल्वे क्षेत्रात येणा-या जागेतील काम प्रगतीपथावर असुन रेल्वे विभागाच्या वतीने मेघा ब्लॉक दिल्यानंतर उर्वरीत काम तीन ते चार महिण्यात पुर्ण होईल व वाहुतक सुरु होईल असे उपस्थित अधिकारी वर्गानी आढावा घेतांना सांगीतले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता राजेन्द्र आचार्य, शाखा अभियंता यतीन नलगीरे, माजी सभापती निलेश किटे, माजी नगरसेवक आशिष वैद्य, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विरु पांडे, मदनसिंग चावरे, मे.शेख एंटरप्राजेसचे प्रतिनीधी यावेळी उपस्थित होते. वर्धा शहरातील अस्तीत्वात असलेला आचार्य विनोबा भावे पुल अरुंद असल्यामुळे वर्धा शहरातील व परीसरातील नागरिकांना वाहतुकीचा त्रास मोठया प्रमाणात होत आहे. तसेच अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होते व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे पुलांच्या रुंदीकरनाचे कार्य तातडीने होणे गरजेचे आहे.
बजाज चौक जवळील उड्डान पुलाच्या दोन्ही बाजुचे पोच मार्ग झालेले असुन काही कामे प्रगतीपथावर आहे, सदर कामामध्ये अनेक अडचणी आल्या यामध्ये पुलाच्या बाजुला राहणारे नागरीकांचे स्थंलातर, अतीक्रमन, इलेक्ट्रीक लाईनचे स्थलांतर, रेल्वे विभागाकडून वारंवार बदलेले डिझाईन यामुळे २०१५ मध्ये सीआरएफ मधुन मंजुर झालेल्या पुल ८ वर्षापासून पुर्ण झालेला नाही, काम पुर्ण व्हावे यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करुन, रेल्वे विभाग, अधिका-यांच्या बैठका, केन्द्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, आज रेल्वे वरील गटरचे काम जलदगतीने सुरु असुन येत्या ३ ते ४ महिण्यात काम पुर्ण होऊन वाहुतुक सुरु होईल असा विश्वास यावेळी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.