४ जिल्हाभर मादक पदार्थ शोध मोहीम- जिल्हाधिकारी कर्डिले

वर्धा/प्रतिनिधी अल्पवयीन मुलांसह तरुणांमध्ये मादक पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. समाजासाठी हे अतिशय घातक आहे. त्यामुळे बालकांना अशा पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा तसेच जिल्हाभर मादक पदार्थ शोध मोहीम राबवून या पदार्थाच्या विक्रीत सहभागी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. मादक पदार्थांचा गैरवापर व प्रतिबंध समितीच्या बैठकीत ते १ रोजी बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक नुरूल हसन, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत विधाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी माधुरी भोयर, चाईल्ड लाईनचे यंत्रणेबरोबर जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड लाईन व ईतर सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या. गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी गांजा पिणार्यांविरुद्ध कारवाईची मोहीम उघडली असल्याचे पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी सांगितले. अमली पदार्थ आढळल्यास दंडासह शिक्षा भारतामध्ये एनडीपीएस म्हणजेच अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार कुठलाही मादक पदार्थ बाळगणे हा गुन्हा आहे. हे पदार्थ वैयक्तिक वा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरणेही गुन्हाच आहे.
मादक पदार्थ आढळून आल्यास या पदार्थाच्या प्रमाणानुसार दंड व शिक्षेची तरतूद असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जिल्हा समन्वयक आशिष मोडक आदी उपस्थित होते. नशा केल्यानंतर आपण काय करतोय याची शुद्ध राहत नसल्याने अल्पवयीन मुले गुन्हेगारीत अडकत जातात. याचा भयंकर दुष्परिणाम सेवन करणार्या बालकांच्या किंवा व्यक्तीच्या मनावर, शरीरावर होत असतात. व्यसन हा आजार आहे. वेळेवर तज्ज्ञांची मदत घेतल्यास पुढील जीवन सुखी होऊ शकते.
यासाठी सर्व यंत्रणांनी समनव्याने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कर्डिले यांनी संबंधित यंत्रणांना दिले तसेच पोलिस यंत्रणेबरोबर जिल्हा महिला व बाल विकासविभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्डलाईन व ईतर सामाजिक संस्थांनी समन्वयानेकाम करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी केल्या. गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलिसांनीगांजा पिणार्यांविरुद्ध कारवाईची मोहीमउघडली असल्याचे पोलिस अधीक्षक नुरूलहसन यांनी सांगितले. अमली पदार्थ आढळल्यास दंडासह शिक्षा भारतामध्ये एनडीपीएस म्हणजेचअमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसारकुठलाही मादक पदार्थ बाळगणे हागुन्हा आहे. हे पदार्थ वैयक्तिक वा अन्य कोणत्याही कारणांसाठी वापरणेही गुन्हाच आहे. मादक पदार्थ आढळून आल्यासया पदार्थाच्या प्रमाणानुसार दंड व शिक्षेची तरतूद असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.