ठाकरे गटाला हायकोर्टाचा पुन्हा दणका; ‘५० खोके एकदम ओके’ महागात पडलं

नवी दिल्ली/प्रतिनिधी राज्यातल्या सत्तासंघर्षापासून चर्चेतअसलेली घोषणा म्हणजे ५० खोके एकदम ओके. ठाकरे गटाने दिलेल्या या घोषणेमुळे आता त्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. हायकोर्टाने या प्रकरणी त्यांना सुनावलं आहे. ५० खोके एकदम ओक्के हे शिवसेनेच्याआमदारांविरोधात केलेले वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाकावे, असेआदेश दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटालादिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी २००० कोटी देऊननिवडणूक आयोगाकडून चिन्ह खरेदी केलं.५० कोटी देऊन आमदार खासदारांना विकतघेतले. …शिवसेनेतून घाण निघाली आहे…आणि ५० खोके एकदम ओके अशा अनेकविधानांवर कोर्टाने आक्षेप नोंदवला आहे आणि ते सोशल मीडियातून हटवण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समन्स बजावलं आहे. संजय राऊत यांनाही या खटल्यात समन्स बजावलं असून १७ एप्रिल रोजी पुढची सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदेंसह अनेकआमदार-खासदार पक्षातून वेगळे झाल्यानंतरत्यांच्यावर अनेक आरोप झाले. शिंदेंनीआमदार खासदार खरेदी केल्याचं विरोधक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून बोललं जाऊ लागलं. यानंतर अधिवेशनात किंवा इतर अनेकसार्वजनिक ठिकाणी, सभांमध्ये सोशलमीडियावर संजय राऊत, उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे आणि त्यांच्यासोबतच्यानेत्यांवर टीका केली. ५० खोके एकदम ओके, ही त्यातली एक प्रमुख घोषणा होती. तसंच अनेकदा शिंदे गटावर टीका करताना ठाकरे गटाची जीभ घसरल्याचंही दिसून आलं होतं.