४ वर्षाचे थकीत ५ लाख रुपयांची अर्ध्या तासात निकाली

वर्धा/प्रतिनिधी सामान्य नागरिकांच्या समस्या सोडणवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती दरम्यान आयोजित सेवा पंधरवाड्यात एक अनोखा निर्णय देण्यात आल्याने राष्ट्रनेता ते राष्ट्रपित्याच्या नावाने आ. डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने स्थानिक विकास भवनात सुरू असलेल्या उपक्रमाचे यश म्हणावे लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, नागरी (वरोरा) जि. चंद्रपूर येथील पावरग्रिड ट्रान्समिशन कार्पेरेशन या कंपनीने ४०० के. व्ही. डबल सकर्ीट वर्धा-परळी पारेशन वाहिन्यांच्या भूसंपादनाकरिता देवळी तालुक्यातील मौजा टाकळी दरणे येथील अजाब पंजाब कडू, ज्ञानेेशर मोहिजे, सुनील मोहिजे या ३ शेतकर्यांची जमीन टॉवरसाठी अधिग्रहित केली होती. मात्र, तिन्ही शेतकर्यांना अद्याप मोबदला देण्यात आला नाही. त्यासाठी शेतकर्यांनी संबंधीत कंपनी तसेच शासकीय कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, त्यात यश मिळाले नाही.

दरम्यान, वर्धेतील विकास भवन येथे सुरू असलेल्या सेवा पंधरवाड्यात शेतकरी सुनील मोहिजे याने आज २० रोजी आ. भोयर यांनी विकास भवन येथे सुरू केलेल्या सेवा पंधरवाड्यात उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्याकडे अर्ज केला. ४ वर्षांपासून सुरू मोबदला न मिळाल्याचे खरे कारण शोधल्यानंतर शेत सर्वे क्रमांकच चुकीचा टाकल्याचे पुढे आले होते. तो दुरुस्त करुन देण्यात यावा या मागणीसाठी ४ वर्षांपासून त्याचे प्रयत्न सुरू होते. आज आ. पंकज भोयर यांच्या सुचनेवरून उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांनी प्रकरण तात्काळ निकालात काढले. ४ वर्षांपासून थकीत असलेले मोबदला आपल्याला ८ दिवसात मिळणार असल्याचे पीडित शेतकरी सुनील मोहिजे यांने सांगितले.