पालकमंत्र्यांनी घेतला सेवाग्राम विकास आराखड्याचा आढावा
पवनार ग्रामपंचायत भवन बांधकाम तातडीने पूर्ण करावे व दोन महिन्यात ग्रामपंचायत भवन हस्तांतरित करावे, असेही त्यांनी सांगितले. आराखड्यातील कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोषागार कार्यलयासमोरील जागेत असलेल्या हॉकर्स प्लाझाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण करण्यात यावे असे ते म्हणाले. आराखड्यातील प्रस्तावित असलेली कामे सोलरवर प्रस्तावित करावी, जेणेकरून वीज बचत होऊन विद्युत देयक शुन्य होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करतांनाच ती गुणवत्तापूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष देण्यात यावे, असे पालकमंत्री म्हणाले. सेवाग्राम विकास आराखड्यातील कामे संथगतीने होत असून विकास कामांना गती देण्यात यावी असे पालकमंत्री म्हणाले. सेवाग्राम आश्रम येथे तयार करण्यात येणाऱ्या आर्ट गॅलरीत असणाऱ्या साहित्य सामग्री बाबत सादरीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. वर्धा शहरातील झांशी राणी चौकातील पुतळा लहान असून तिथल्या भव्य पुतळ्याचे डिझाइन तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी, एक अनुभूती’ अंतर्गत मंजूर कामाचा व कार्यान्वित यत्रणाचाही आढावा घण्यात आला.