पहलगाम येथील घटनेचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना धार्मिक ओळख विचारून दहशतवाद्यांनी क्रूर हत्या केली. या घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाने निषेध करीत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष अनूप जयस्वाल यांच्या नेतृत्वात सरचिटणीस सतीश शर्मा, साहील परियाल, भरत आमले, अंकुश ठाकूर, प्रवीण शेवेकर, संजय शर्मा, वैभव निवल, उत्कष पुसदकर, सारभ पाड, राजेश ठाकूर, नीलेश वैद्य, राहुल मिश्रा, ओम वैद्य, हरीश सातपुते, मनोज तिवारी, अजय सोळंकी, जतीन चैनानी, जॅकी दर्डा, गिरीश पंढरी, जतीन पटेल, राहुल उके, सिद्धांत मौर्य, राहुल परियाल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *