राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त २२ व २३ रोजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर : जनसंपर्काची भूमिका विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात महाराष्ट सरकारच माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर, विद्यालयाचा जनसंपर्क विभाग व जनसंपर्क कार्यालय तसेच पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया, वर्धा चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ एप्रिल रोजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर : जनसंपर्काची भूमिका या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन २२ एप्रिल रोजी गालिब सभागृहात सकाळी ११ वाजता कुलगुरू प्रोफेसर कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल.

याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुराग जैन, विशिष्ट अतिथी म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूरचे संचालक डॉ. गणेश मुळे पीआरएसआय पश्चिमचे उपाध्यक्ष एस पी सिंह, नागपूर तसच कलसचिव प्रा. आनंद पाटील उपस्थित राहतील. मानविकी व सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. फरहद मलिक स्वागत भाषण देतील तर जनसंचार विभागाचे अध्यक्ष प्रो. कृपाशंकर चौबे विषय प्रवर्तन करतील. चर्चासत्राचे संयोजक जनसंचार विभागाचे असोसिएट प्रोफेसर डॉ. राजेश लेहकपुरे तर सह संयोजक वर्धा जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते व विश्वविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बी.एस मिरगे असतील. चर्चासत्रात जनसंपर्क अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, माध्यम शिक्षक व विद्यार्थी सहभाग घेतील.

या चर्चासत्रात मीडिया व जनसंपर्कात एआयची उपयोगिता, शिक्षणाच्या विकासात एआयची उपयोगिता, एआयचा प्रयोग : नैतिकता व संकट प्रबंधन, सायबर सुरक्षा आणि एआय या विषयांवर विचार विनिमय करण्यात येईल. चर्चासत्राचा समारोप बुधवार २३ एप्रिल रोजी दुपारी ४:४० वाजता कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होईल. याप्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूरचे संचालक डॉ. गणेश मुळे, सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी संजय इंगळे तिगावकर विशिष्ट अतिथी असतील तर जनसंचार विभागाचे अध्यक्ष प्रो. कृपाशंकर चौबे यांची विशिष्ट उपस्थिती राहील. उद्घाटनानंतर २२ एप्रिल रोजी मीडिया व जनसंपर्क यात एआयची उपयोगिता या विषयावर जनसंचार विभागाचे अध्यक्ष प्रो. कृपाशंकर चौबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सत्रात माहिती व जनसंपर्क सचालनालय नागपरच सचालक डा. गणेश मुळे विशिष्ट वक्ता असतील तर आयआयआयटी नागपूरचे असोसिएट डिन तौसीफ दिवाण विषय तज्ज्ञ म्हणून संबोधित करतील.

सत्राचे संचालन जनसंचार विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. संदीप वर्मा करतील तर पीआरएसआय वर्धा चॅप्टरचे उपाध्यक्ष प्रफुल दाते आभार मानतील. दुपारी तीन वाजता शिक्षणाच्या उत्थानात एआयची उपयोगिता या विषयावर हिंदी विविचे शिक्षण विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. गोपाल कृष्ण ठाकूर यांच्या अध्यक्षतेतील सत्र होईल. यावेळी आयआयआयटी नागपूरचे सहाय्यक प्रोफेसर डॉ. शिशुपाल कुमार, हिंदी विविचे लीला विभागाचे प्रभारी डॉ. अंजनी कुमार राय संबोधित करतील. संचालन जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते करतील तर पीआरएसआयचे कोषाध्यक्ष विनेश काकडे आभार मानतील. बुधवार २३ एप्रिल रोजी तृतीय अकादमी सत्र अकरा वाजता एआयचा प्रयोग : नैतिकता व संकट प्रबंधन या विषयावर होईल. अध्यक्षस्थानी डॉ. गणेश मुळे राहतील. यावेळी आयआयआयटी नागपूरचे असोसिएटेड कौशिक दिवाण व डॉ. अंजनी कुमार राय संबोधित करतील.

संचालन विनेश काकडे करतील तर वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण गावंडे आभार मानतील. चतुर्थ प्राथमिक सत्र दुपारी तीन वाजता सायबर सुरक्षा व एआय या विषयावर होईल. सत्राच्या अध्यक्षस्थानी हिंदी विविचे विधी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो. जनार्दन कुमार तिवारी राहतील. याप्रसंगी डॉ. शिशुपाल कुमार व हिंदी विविचे मुख्य सूचना सुरक्षा अधिकारी डॉ. गिरीश चंद्र पांडे विचार मांडतील. सत्राचे संचालन प्रफुल्ल दाते करतील तर हिंदी विवीचे सहायक संपादक डॉ. अमित विश्वास आभार मानतील. या चर्चासत्रात उपस्थित राहण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासचालनालय, नागपर विश्वविद्यालयाचा जनसंपर्क विभाग व जनसंपर्क कार्यालय तसेच पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया वर्धा चॅप्टर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *