
देवळी येथील जनता हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे “स्पोर्टस् फेस्ट-२०२५’ अंतर्गत “खेलो जनता खेलो’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी जनता विद्यालयाच प्राचार्य धर्मेश झाडे सर यांनी सस्थेच अध्यक्ष रविभाऊ शेंडे यांचा सत्कार केला. तसेच रविभाऊ शेंडे यांच्या हस्ते संस्थेचे संचालक आकाशभाऊ शेंडे, पत्रकार अजीज शेख, किशोर सुरकार, गणेश शेंडे यांचा सत्कार करुन गौरवण्यात आले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक वर्ग यांचा क्रिकेटचा एक प्रदर्शनीय सामना सुद्धा खेळविण्यात आला.