अयोध्येत रामललाचा झाला सूर्यतिलक!

अयोध्येत रामनवमीला दुपारी ठीक १२ वाजता रामलल्लाचा सूर्य तिलक झाला. प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्लाचा हा दुसरा सूर्य तिलक आहे. अभिजित मुहूर्तावर दुपारी १२ वाजता रामलल्लाच्या सूर्य तिलकदरम्यान, त्यांच्या कपाळावर ४ मिनिटे किरणे पडली.त्यानंतर मंदिरात आरती झाली. सूर्य तिलकच्या आधी रामलल्लाचे दरवाजे काही काळ बंद होते. सूर्य तिलक स्पष्टपणे दिसावा म्हणून गर्भगृहातील दिवे बंद करण्यात आले होते.सूर्य तिलकसाठी अष्टधातु पाईप्सपासून एक प्रणाली बनवण्यात आली. यामध्ये, ४ लेन्स आणि ४ आरशांमधून गर्भगृहातील रामलल्लाच्या मस्तकावर किरणे पाठवण्यात आली. रामलल्लाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले आहेत.