राज्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येणार; पुढील ४८ तास महत्त्वाचे
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. पाऊस पडून गेल्यानंतर वातावरण दमट व उष्ण राहणार असा इशारा हवामान विभागाने दिला होता. मात्र तापमानात आता आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत कमाल तापमान ४० अंशापेक्षा जास्त नोंदवले जाऊ शकते. पुढील ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रातील काही भाग कमाल तापमान ४०+ पर्यंत पोहोचू शकतात. वायव्य भागातील अतिरेकी तापमानावर लक्ष ठेवा आणि काळजी घ्या. नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे नाशिक आणि आसपासच्या लोकांनी कृपया लक्ष ठेवा, असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईचा पारा ३५ वर असला तरी हवामान उष्ण आणि दमटच राहील, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावरील चक्राकार वारे वाहत असून उत्तरमहाराष्ट्रापासून उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचाकमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरीलबाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होत असल्याने राज्यात ढगाळ वातावरणदेखील कायमअसणार आहे. यंदाच्या उन्हाळी हंगामात (एप्रिलते जून) देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उन्हाचा चटकातापदायक ठरणार असून, राज्यात तीव्र उष्णलाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आह. एप्रिल महिन्यात महाअधिक तापण्याची शक्यता असल्यहवामान विभागाकडून सांगण्यात आले.