४२ गावातील ९५ जल स्त्रोतात नायट्रेड
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : तालुक्यातील ४२ गावांमध्ये ९५ जलस्त्रोत नायट्रेटने बाधीत झाल्याचे भूजल सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यात वर्धा तालुयातील वघाळा, चितोडा, नादोरा, नागापर, तुळजापूर आणि धोत्रा गावांचा समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार पिण्याच्या पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण ४५ पीपीएम पेक्षा जास्त असले तर ते पिण्यासाठी धोयाचे असते. प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आली असून रासायनिक तपासणी १४९३, जविक तपासणी २९४२, एकूण दूषित स्त्रोत १७४ आढळले. प्रयोगशाळा तपासणीमध्ये सर्वात जास्त वघाळा गावातील पाणीपुरवठा विहीरीमध्ये सर्वात जास्त १४५ नायट्रेटचे प्रमाण आढळून आले आहे. परत तपासणीमध्ये १७ जानेवारी रोजी १४२ नायट्रेटचे प्रमाण आढळून आले. याबाबत वघाळा गावामध्ये पर्यायी कुठलेही व्यवस्था करण्यात आलेली नाही.
विहिरीजवळ पाणी पिण्यास अयोग्य, असे सुद्धा लिहिले नाही. पिण्याच्या पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असले तर पोटाचा कर्करोग, लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिड्रोम, जन्मदोष, जन्मजात व्यंग न्युरल ट्यूब दोष आदी आजार होतात. याबाबत जिल्हास्तरावरुन भेटी देण व व्हिजीट लिहीण्यापलीकडे कुठलेही कायवाही झाली नाही. महत्त्वाचे म्हणचे प्रत्येक ग्रामपंचायतीला गावनिहाय पाणी तपासणीकरिता टेस्ट किट दिलेल्या आहे. परंतु, जिल्हास्तरावरुन आलेले अधिकारी कधीच ग्रामपंचायतीला दिलेल्या किटनं तपासणी करीत नाही.