हस्तांतरण अन् बायोमेट्रिक फेस रिडिंग कार्यप्रणालीस विरोध
प्रतिनिधी/दै.जन-संग्राम वर्धा : हिवताप याजनेच हस्तांतरण व बायोमेट्रिक फेस रिडिंग कार्यप्रणालीस राज्यातील हिवताप व हत्तीरोग कर्मचार्यांनी तीव विराध दशविला असन बधवार ९ राजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ लक्षवेध आक्रोश निदर्शने केली. राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये अधिकारी व कर्मचार्यांच्या सेवा विषयक बाबी जिल्हा परिषद प्रशासनाकडे हस्तांतरण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने २२ नोव्हेंबर २०१९ रोजी परिपत्रक काढले होते. या परिपत्रकात कालबद्ध पदोन्नती, पदोन्नती, वेतन, सेवाभरती, स्थानांतरण, सेवाज्येष्ठता, प्रशासकीय कार्यवाही आदी बाबी कर्मचार्यांवर अन्यायकारक ठरत असल्याने तत्कालीन परिस्थितीत संघटनेने विरोध करीत सनदशीर मार्गाने आंदोलने केली.
हिवताप योजनेतील अधिकारी व कर्मचार्यांच्या सेवा जिल्हा परिषद प्रशासनाकडे सोपविल्यास प्रशासनिक कार्यात गुंतागुंत निर्माण होऊन अनेक अडचणी निर्माण होणार असल्याने कर्मचार्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबर २०१९ चे ते शासन परिपत्रक रद्द करण्यात यावे, अशी मागणी या आंदालनातन करण्यात आली आहे. मागण्याच निवदन जिल्हाधिकायामाफत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सी. एम. मुटकुळे, सरचिटणीस रुपेश राहणे, प्रवीण चिंचोळकर, गणेश पवार, विनोद भालतडक, दिलीप बरवड, अरविंद बोटफोले, सतीश इंगोले, सुनील राठोड, एस. एस. तवटम यांच्यासह जिल्ह्यातील हत्तीरोग व हिवताप विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.