घटना दुर्दैवी, पोलिस दलातील होनहार कर्मचारी गमावला- विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ
मृतक पोलिस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल त्यासाठी प्रयत्न करू. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांच्या नोकरीचा प्रश्न असल्यास अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत कसे सामावून घेता येईल, यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे डॉ. भुजबळ म्हणाले. विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी हिंगणघाट उपविभाग, आर्वी, तळेगाव येथील वार्षिक निरीक्षण आढावा घेतला असून आज शहर पोलिस ठाण्यातील निरीक्षण आढावा घेण्यासाठी वर्धेत दाखल झाले. कृती कार्यक्रमांतर्गत दाखल गुन्हे, तपास, गुणात्मक तपास करून कोर्टात सादर केल्यानंतर या गन्ह्याची चाचपणी करणे, वाहतूक कक्ष, रस्ता सुरक्षा, अपघात क्षेत्राचा आढावा घेऊन पोलिस कर्मचार्यांना यासंदर्भातील मार्गदर्शन दौर्यादरम्यान करण्यात येत असल्याचे डॉ. भुजबळम्हणाले. तत्पुर्वी, डॉ. भुजबळ यांनी शहर ठाण्यातील नवीनअभ्यागत कक्षाचे उद्घाटन केले.
शहर ठाण्यात येणारे तक्रारदार,फियादी यांच्या अडचणी, तकारी,मार्गदर्शनासाठी या अभ्यागतकक्षाची स्थापना करण्यात आलीआहे. या कक्षातून पीडित,तक्रारदार, फिर्यादींना योग्यमार्गदर्शन मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज अनेक पोलिस ठाण्यातकर्मचार्यांची पदे रिक्त आहेत.काही दिवसांपूर्वीच पालकमंत्रीडॉ. पंकज भोयर यांनी यासंदर्भातएक आढावा घेतला आहे.शासनस्तरावर रिक्त पदांसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आलाअसल्याची माहितीही त्यांनीयावेळी दिली.