ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयात सुविधाच नाही; डायलिसिस व्यवस्था करण्याची मागणी

शरीरातील अनावश्यक घटक लघवीद्वारे शरीराबाहेरकाढण्याचे काम किडनी हे अवयव करते. मात्र, बदलते हवामान, चैनीच्या वस्तूंचा अधिक वापर, व्यसनाधीनता आणि फास्ट फूड खाण्याने अनेकरोगांची निर्मिती झाली आहे. यात किडनी खराब होण्याचे आजार अनेकांना जडले आहेत. किडनी निकामी झाल्याने या रुग्णांना आठवड्यातून दोनदा डायलिसिस करून कृत्रिमरीत्या शरीरातील अनावश्यकपदार्थ काढून टाकावे लागतात. वर्धा जिल्ह्यातडायलिसिसची व्यवस्था केवळ जिल्हास्थळी आहे. रुग्णाची हेडसाळ थाबण्यासाठी तालुका स्तरावरसुविधा करण्याची मागणी नागरिकाकडून होतआहे.