पालकमंत्री डॉ.पंकज भोयर दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर

वर्धा/प्रतिनिधी राज्याचे गृह (ग्रामीण), गृह निर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनीकर्म राज्यमंत्री तथा पालकमत्री वधा डा. पकज भायर दि. २५ व २६ जानेवारी रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे. दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता नागपूर येथून वर्धेकडे प्रयाण करतील. सकाळी १०.३० वाजता वर्धा येथे आगमन व जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजितशालय शिक्षण विभागाच्या आढावा बठकीत उपस्थिती. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन कार्यकारी समितीच्या जिल्हा वार्षिक योजना बैठकीस उपस्थिती. दुपारी १ ते २ राखीव. दुपारी २ वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात कायदा व सुव्यवस्था संदर्भात आयोजित बैठकीस उपस्थिती. दुपारी २.३० वाजता श्री. कृष्णगिरी महाराज विश्वशांती धाम धोत्रा (रेल्वे) येथे आयोजित श्रीमद भागवत कथा रथ यात्रेस उपस्थिती.

सायंकाळी ५.०० वाजता शहीद भगतसिंग मैदान रामनगर यथील शहीद भगतसिंग व्यायाम शाळा व सोलर हायमॅक्सचे लोकापर्ण साहेळ्यास उपस्थिती. सायंकाळी ६ वाजता रामदास तडस इनडोर स्टेडियम देवळी येथे आयोजित महिला कुस्ती स्पर्धे च्या बक्षिस वितरण कार्यक्रमास उपस्थिती. दि. २६ जानेवारी रोजी जिल्हा क्रिडा संकुल वर्धा येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह येथे वडार समाजाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ४ वाजता बीएमडब्यू क्रिकेट मैदान गणेशनगर बोरगाव मेघे येथे आयोजित आमदार चषक २०२५ च्या कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता स्वावलंबी मैदान येथे आयोजित लॉयन्स फुड फेस्ट कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८ वाजता पुष्पविश्व सदर एमआयडीसी वर्धा येथे आयोजित मित्रमडळ स्नहसंमलन कार्यक्रमास उपस्थिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *