सिंदी (मेघे) प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेचा प्रश्न निकाली
वर्धा : शहरा लगतच्या परिसराची वाढलेली व्याप्ती व त्या तुलनेत आरोग्याची अपुरी सुविधा लक्षात घेता. आ. डॉ. पंकज भोयर यांनी पाच प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी प्राप्त केली होती. मात्र सिंदी (मेघे) येथील पीएचीसी निर्माण कार्यात जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर जागेचा प्रश्न निकाली निघाला असून आरोग्य केंद्राचा मार्ग सुकर झाला आहे. वर्धा शहराची व्याप्ती कमी असल्याने मागील तीन दशकात लगतच्या १३ ग्रापं परिसरात मोठया प्रमाणात शहरीकरण झाले आहे. दिवसागणिक या भागात नागरी वस्ती वाढत आहे. शहरालगतच्या भागात ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे.
या परिसरामुळे जिल्हा सामान्य रूग्णालय, सेवाग्राम व सावंगी मेडिकल दूर असल्याने येथील नागरिकांना आरोग्याची सुविधा घेताना अनेक अडचणी येत होता. तथापि, या भागांसाठी स्वतंत्र अशी आरोग्य व्यवस्था असावी, यासाठी आ. डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेऊन सिंदी (मेघे), बोरगाव (मेघे), साटोडा, पिपरी (मेघे) व सालोड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी शासन दरबारी सतत प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांची फलक्षृति म्हणून शासनाने १५ फेब्रुवारी २०२३ ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या पांच प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजूरी प्रदान केली होती.